Translate

बुधवार, २७ मार्च, २०१९

# छूपी गवार #

आज भाजी काय करायची हा समस्त  गृहीणींना पडलेला  ज्वलंत प्रश्न? या प्रश्नावर अजूनही तोडगा निघाला नाही व निघेल याची शाश्वती नाही असो. आज ही नेहमी प्रमाणे मला पण प्रश्न पडला भाजी काय करायची कारण कांदे बटाट्याने घरातून केव्हाच पळ काढला होता 1कांदा टोपलीत उदास बसला होता. तर कडधान्य पण अंतर्धान पावले होते. प्रश्न थोडा बिकट होता सहज मिञाचे दार वाजवले फार प्रेमळ आणि मनकवडा आहे (आहो फ्रीज हो!) तो माझ्या हाकेला धावतोच, पण माझे सहत्र अपराध पण तो स्वतःहा च्या पोटात दडवतो. पण आज तोही रूसला होता फक्त दूध, दही, मिरची, कोथिंबीर एवढेच पोटात साठवून बसला होता. शेवटी मोबाईल मध्ये डोळे घालून बसलेल्या पतीराजांना आवाज दिला थोडा रागातच😱 शब्दाची लाखोली वाहिली. जरा बाजारात जाऊन वेगळी भाजी आणली तर बरे होईल. सांगितलंच नाही घरात एक पण भाजी नाही, नाहीतर जाऊ द्या😱 बोलण पचणी पडलं वाटतं महाशयांनी पिशवी सह बाजारात प्रस्थान  केले मी पण थोडा सूटकेचा निश्वास सोडला. बस्स आता येईल त्या भाजीला सामोरं जायच हा दृढनिश्चय केला.
तर आली धावत लचकत मूरडत गवार प्रथमदर्शनी खुप राग आला, कारण निवडणार कोण? हा यक्षप्रश्न समोर आ वासून उभा राहिला. मम्मा मला गवार नको आहे हं! हा बालीश आवाज कानात दूमदूमला. पण कानावर काही पडलेच नाही, या अविर्भावात गवार स्वच्छ धुऊन, तिचे धस काढून, कात्रीने एकसारखी कापून घेतली. कांदा, खोबरे याचे वाटण केले, 2,3लसून पाकळ्यांना पण त्यातच टाकले. छोटा कूकर, हा पण माझा सख्खा मित्र. 😀हे वाटण मोहरी, हिंग, जिराची फोडणी केली. त्यात वाटण टाकून छान परतले मग लाल तिखट गरम मसाला यातच टाकला बेताचे पाणी घालून छान उकळून घेतला म्हणजे मसाला छान मूरतो थोडा ओवा टाकल्या मूळे चव पण छान येते व वातूळ भाजी असल्याने पचायला बरी मस्त वाटण तयार झाल्या वर गवार टाकली परत रस्सा बनवण्यासाठी व शिजवण्यासाठी बेताने पाणी घातले. मग दाण्याचे कुट व थोडा गूळ घालून 2शिट्टया काढल्या. नतर पाच मिनिटात प्रेशर काढून घेतले त्यामुळे भाजी मस्त शिजतेच व गाळ होत नाही. गॅस व वेळ दोन्हीची बचत वरुन कोथिंबीर ताईची साखर पेरणी नाक मूरडत छूपी गवार कन्येने ताव मारून खाल्ली आणि थोडी जास्त हावी होती अशी मागणी केली. पण बाबांनी छान गवार आणली म्हणूनच भाजी छान झाली असा टोमणा मारायला ही नाही विसरली. 😅😅सख्यांनो अलंकारी भाषेत छूपी गवार रेसिपी तूमच्या पर्यंत पोहचवण्याचा छोटा प्रयत्न . 😀 🙏🙏




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा